
सोनिया उपासनी
पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे फुटवेअर निवडायचे? साहजिकच, आपल्याला असे फुटवेअर निवडावे लागतील जे केवळ किफायतशीर नसून स्टायलिशही असतील.
कडक उन्हाची जागा आता थंडगार सरींनी घेतली आहे. पावसाळ्याच्या आगमनाने सारा आसमंत हिरवागार झालेला आहे. रिमझिम पावसात भिजायची इच्छा प्रत्येकालाच होते. पावसाळी सरींना सुरुवात झाली, की खाण्यापिण्याबरोबरच कपड्यांपासून फुटवेअरपर्यंत सर्व गोष्टी बदलाव्या लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत आपण जेवढे लक्ष आपल्या कपड्यांकडे देतो तेवढेच लक्ष आपल्या फुटवेअरकडेही दिले पाहिजे. कारण पावसाळ्यात फुटवेअर सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.