

Long Lasting Body Fragrance
esakal
स्वप्ना साने
अंघोळीच्या पाण्यात इयु द कोलोनचे काही थेंब टाकावेत. अंघोळीनंतर लगेच ओलसर त्वचेवर बॉडी लोशन लावावे. वॉटर बेस्ड बॉडी मिस्ट वापरावे. जास्मिन, गुलाबसारखे फ्लोरल सुगंध किंवा ऑरेंज किंवा लाइमसारखे सिटरस सुगंध असे प्रॉडक्ट्स वापरावेत, म्हणजे बॉडीवर सुगंध दीर्घकाळ टिकतो.
पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवळ बहरते, वातावरणात गारवा जाणवतो, पण तरीही वातावरणात उष्णता थोडीफार असतेच. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी-जास्त होत असते. या हवामान बदलाचा परिणाम त्वचेवरदेखील होत असतो आणि तो आपल्याला लगेच जाणवायलाही लागतो. एखाद्या व्यक्तीची ड्राय स्कीन असेल, तर ती पावसाळ्यात नॉर्मल जाणवू शकते, नॉर्मल स्कीन थोडीफार ऑयली जाणवू शकते आणि ऑयली स्कीन आहे तशीच किंवा कमी तेलकट जाणवू शकते. हे त्वचेत होणारे बदल प्रत्येकाला वेगवेगळे जाणवू शकतात.