Premium|Importance of Museums in Society : छंदातून घडणारा वारसा; जुन्या आठवणींचे जतन करून पिढ्यांना जोडणारी संग्रहालयांची किमया

Preserving Heritage for Future Generations : संग्रहालय हे केवळ वस्तूंचे जतन नसून अर्थव्यवस्था, पर्यटन आणि संशोधनाचा भक्कम आधार आहेत; तसेच वैयक्तिक छंदातून जन्म घेणारा हा अनमोल वारसा डिजिटल युगात व्हर्चुअल टूर्सच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
Preserving Heritage for Future Generations

Preserving Heritage for Future Generations

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

संग्रहालय हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक भक्कम पूल आहे. याशिवाय ही अर्थव्यवस्था, पर्यटन आणि संशोधन यांनाही चालना देतात. ती लाखो पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक रोजगार निर्माण करतात. तसंच संशोधकांसाठी तर हा एक खजिनाच आहे. आजच्या डिजिटल युगात तर अनेक संग्रहालयं तंत्रज्ञानाचा वापर करून व्हर्चुअल टूर्सद्वारे आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा अगदी सहजतेने जिवंत अनुभव देत आहेत.

वस्तूंचा संग्रह करणे हा अनेक लोकांचा आवडता छंद असतो. काहींना जुनी नाणी जमवायला आवडतात. कुणी तांब्या-पितळ्याची जुनी भांडी जमवतात. पोस्टाची तिकिटं हल्ली दुर्मीळ होत चालली आहेत, पण मागच्या काही पिढ्यांतील लोकांना ही तिकिटं जमवण्याचा छंद होता. काही लोकांकडे घरातील पिढ्यान्‌पिढ्यांचे फोटो असतात. कुणी समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर तिथले शंख-शिंपले गोळा करतात. तर कोणी निरनिराळ्या आकाराचे, रंगांचे दगड जमवतात. या छंदामुळे माणसाची निरीक्षणशक्ती आणि जिज्ञासा वाढीस लागते. खरंतर या जमवलेल्या प्रत्येक वस्तूमागे एक वेगळी आठवण दडलेली असते. एक प्रकारे त्या आठवणी जतन करण्यासाठी आणि हा लाखमोलाचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी आपण या वस्तूंची काळजी घेतो. जेव्हा हा भूतकाळातला अनमोल वारसा भविष्यातील काही पिढ्यांसाठी वर्तमानकाळात सार्वजनिक किंवा मोठ्या स्तरावर जपला जातो, तेव्हा संग्रहालय ही कल्पना जन्म घेते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com