संतोष शेंडकर
मशरूमकडे भूछत्र या दृष्टीने पाहिल्याने आपल्याकडे आहारात फारसा वापर होत नव्हता. मात्र त्या दृष्टिकोनात बदल होत आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतात मशरूम उद्योगाच्या वाढीसाठी प्रचंड संधी आहेत. मात्र याचा प्रचार, प्रसार सर्वत्र होणे गरजेचे आहे.
अळंबी म्हणजेच मशरूम हा शंभर टक्के शाकाहारी आणि कुजणाऱ्या जैविक पदार्थांवर वाढणारा एक परजीवी प्रकार आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, तर फॅट्स, स्टार्च आणि कोलेस्ट्रॉल मात्र अत्यल्प प्रमाणात असते. त्यामुळेच मशरूम आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. हा पदार्थ धडधाकट व्यक्तींसह आजारी रुग्णांकरिता तसेच लहान मुलांकरितादेखील पोषणमूल्यांनी समृद्ध आहे.