

Nail Care
sakal
स्वप्ना साने
नखांना मिळणारे पोषण जर कमी पडले, म्हणजेच शरीरात
एखाद्या पोषकतत्त्वाची कमतरता असेल, तरी त्याचा पहिला परिणाम त्वचेवर आणि नखांवर दिसून येतो. नखे पिवळी पडू लागतात, नखांची चमक जाते किंवा नेल बेड रफ जाणवतो. कधी नखे काळवंडलेली दिसतात.
सौंदर्यशास्त्रात ‘नखशिखांत’ सुंदर म्हणजे नीटनेटके, स्वतःची त्वचा आणि केसांची काळजी घेऊन छान दिसणे. यांत पायांच्या नखांपासून ते डोक्यावरच्या केसांपर्यंतचे सौंदर्य अभिप्रेत आहे. आता पूर्वीसारखे फक्त केस आणि त्वचेपुरतेच ब्यूटी पार्लर मर्यादित राहिलेले नाही, तर नखांसाठीदेखील स्पेशल सलॉन्स सुरू झाली आहेत. नेल आर्ट, नेल स्पा, नेल एक्सटेन्शन्स, आर्टिफिशिअल नेल्स असे बरेच प्रकार बघायला मिळतात.