Premium|Nalanda Mahavihara UNESCO World Heritage : नालंदा विद्यापीठ: प्राचीन भारतातील शैक्षणिक परंपरेचा उज्ज्वल वारसा

Indian Education History and European Architecture : जगातील पहिले आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठ आणि गोव्यातील भव्य पोर्तुगीजकालीन चर्चचा वारसा भारतीय संस्कृतीतील वैविध्य दर्शवत असून, इतिहासप्रेमी पर्यकांसाठी या प्राचीन वास्तुशिल्पांची सफर एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, याची खात्री बाळगा.
Indian Education History and European Architecture

Indian Education History and European Architecture

esakal

Updated on

वरूण परब

नालंदा विद्यापीठ महाविहार

  • जवळचे शहर : पाटणा

  • जवळचे विमानतळ : जय प्रकाश नारायण

  • विमानतळ, पाटणा

  • जवळचे रेल्वेस्थानक : राजगीर

  • केव्हा जाल? : डिसेंबर ते मार्च

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : बिहारमधील पाटणा शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर नालंदा या प्रसिद्ध प्राचीन महाविहार आणि विद्यापीठाचे अवशेष सापडतात. प्राचीन वाङ्‍मयात नालंदाची नल, नालक, नालकग्राम, नालंद वगैरे भिन्न नामांतरे आढळतात. भारतात प्रवासास आलेल्या फाहियान (४००-४११), ह्युएनत्संग (६३०-६४४) व इत्सिंग (६७३-६८५) या तीनही प्रसिद्ध चिनी प्रवाशांनी आपल्या प्रवासवृत्तांमध्ये नालंदा विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरा व समृद्ध संस्कृतीसंबंधी सविस्तर माहिती लिहिली आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, मौर्य काळापासून ते इ.स. तेराव्या शतकापर्यंत एवढा प्रदीर्घ काळ नालंदा जगातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र म्हणून कार्यरत होते. वर्धन आणि पाल (इ.स. आठवे ते बारावे शतक) या दोन राजवंशांचा काळ नालंदासाठी भरभराटीचा होता. सद्यःस्थितीत या महाविहाराचे अवशेष ११ विहार आणि १४ मंदिरे असलेल्या २३ हेक्टर क्षेत्रात पसरले आहेत. ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम याने या स्थळाचा शोध १८७१मध्ये लावला. इथे झालेल्या उत्खननात ब्राँझच्या मूर्ती, अनेक पायऱ्या असलेली उत्तुंग मंदिरे, मधे चौक व भोवताली व्हरांडा आणि अनेक खोल्या असलेले अनेक विहार आणि सभागृहे सापडली. विहारातील स्तंभ आणि भिंती सुंदर चित्रांनी सजविल्या आहेत. प्राचीन भारतातील शिक्षण व्यवस्था, विद्यापीठाची पद्धत, विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन अशा अनेक चित्तवेधक पैलूंवर नालंदा विहार प्रकाश टाकतो. नालंदामध्ये पाच-पदरी स्वरूपाच्या चैत्याकृतीचा उदय आणि मुख्य प्रवाहात त्याचे आगमन दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com