

Ancient Indian Trade Routes
esakal
नाणेघाट म्हणजे प्राचीन भारताने जगासाठी उघडले गेलेले व्यापारी द्वार. हा दगडी रस्ता राणी नागनिकेच्या कर्तृत्वाचा अमर ठेवा आहे आणि स्त्री-सामर्थ्याचा आरसा दाखवणारे प्रचंड प्रतीक आहे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया म्हणून हे विशाल सह्याद्रीच्या कपाळावर गोंदलेले लेणे अभूतपूर्व ऐतिहासिक ठेवा ठरते.
खूप वर्षांपासून मला नाणेघाट प्रत्यक्ष पाहायचा होता. प्राचीन इतिहासाचा अभ्यास करताना हा घाट वारंवार समोर येत राहिला. अनेकदा जुन्नरला जाऊनही नाणेघाट न पाहिल्याची एक हुरहूर मनात होती. अखेर ठरवून मी सह्याद्रीच्या कातळरांगांमध्ये उभा राहिलो आणि जाणवलं, हा केवळ घाटमार्ग नाही, हा अडीच हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राला जागतिक नकाशावर नेणारा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे.