फूडपॉइंट |सुप्रिया खासनीस
नारळी भात
वाढप
४ ते ६ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन वाट्या तांदूळ, ३ ते ४ लवंगा, दीड ते दोन वाट्या चिरलेला गूळ,
१ खोवलेला नारळ, तूप, मीठ, ड्रायफ्रुट्स.
कृती
सर्वप्रथम एक डाव तुपावर धुतलेले तांदूळ लवंगा घालून जरा परतून घ्यावेत. नंतर तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवून घ्यावा. वाफ जिरल्यावर भात परातीत उपसून घ्यावा. भात गरम आहे तोपर्यंत त्यात नारळाचा चव, थोडे मीठ आणि चिरलेला गूळ घालून झाऱ्याने सारखा करून घ्यावा. नंतर एक डाव तुपावर ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे परतून घ्यावेत व त्यात वेलची पूड घालून केलेला भात थोडा परतावा. गार झाल्यावर खावयास द्यावा. हा भात गारच चांगला लागतो. तुपाचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त करू शकता.