
भावेश ब्राह्मणकर
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नाशिकजवळच्या ओझर येथील कारखान्यात लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. याच कारखान्यात उत्पादित होणाऱ्या विमानांना लागणारे असंख्य सुटे भाग नाशिकमधील संरक्षण उद्योगांकडून पुरविले जातात. अधिकाधिक सुट्या भागांचा पुरवठा व्हावा यासाठी एचएएलकडून खासगी उद्योजकांना आवाहन केले जात आहे.