
विक्रांत मते
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असे दोन भाग करावे लागतील. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशकात काँग्रेसी व हिंदुत्ववादी नेतृत्वाची जडणघडण झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व बाबाराव सावरकर यांनी हिंदुत्ववादी विचारांना बळ दिले. त्याकाळी नाशिक तालुक्यातील भगूर हे सावरकरांचे गाव व जुन्या नाशिकमधील तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिर ही स्वातंत्र्यलढ्याची केंद्रे होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात नाशिकच्या क्रांतिकारकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.