
जगदीश देवरे
परंपरागत क्रीडाप्रकारांत नाशिकचे यश पूर्वी नेहमीच खुलून दिसायचे. आतादेखील खेळातली आधुनिकता स्वीकारताना नाशिकचे क्रीडा क्षेत्र स्वत:ला मागे ठेवू इच्छित नाही. गुणवत्ता हा इथल्या मातीचा मूळधर्म आहे. इथले क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि खेळाडू हीच गुणवत्ता जोपासताना दिसत असल्याने या क्षेत्रात नाशिकच्या योगदानाचा टक्का वाढताना दिसतोय.