मैत्रेयी पंडित-दांडेकर
हॅलो! मी अवनी (वय वर्षं सात) आणि माझ्या धाकट्या बहिणीचं नाव नीवा (वय वर्षं तीन). आमच्या जोडगोळीला सगळे प्रेमानं ‘अवनीवा’ म्हणतात. आमच्या पुणेकर मम्मानं (मैत्रेयी) आणि मुंबईकर बाबानं (निखिल) आधी शिक्षण आणि मग नोकऱ्यांसाठी अमेरिका गाठली आणि मग आम्ही छोकऱ्या इथं जन्माला आल्यावर त्यांनी कॅलिफोर्नियात आपला मुक्काम पक्का केला. या आमच्या अनिवासी भारतीय पालकांच्या आणि त्यांच्या जन्मानं अमेरिकन पण वंशानं भारतीय, आम्हा मुलींच्या दैनंदिन जीवनातल्या पालकत्वाच्या आणि बालकत्वाच्या लुटुपुटुच्या लढायांवरील आमच्या मम्मानं लिहिलेल्या गोष्टी म्हणजे ‘अवनीवाच्या गोष्टी’.