एवढ्या अंधारातही तो एका जागी कशाचाही आधार न घेता तरंगत राहिला; जाणून घ्या लहानग्या नीरजचा पोहण्याचा प्रेरणादायी प्रवास!

गेटवे ऑफ इंडिया लांबून पुसटसे दिसायला लागले तसे गौरवसोबत नीरज, मिहीर आणि हर्षददेखील पाण्यात उतरले आणि एकत्रितच गेटवे ऑफ इंडियाला पोहोचले
swimming
swimming esakal

नेहा विवेक अभ्यंकर

सत्तावीस वर्षे झाली. ३ नोव्हेंबर १९९७. माझा मुलगा नीरज अडीच वर्षांचा असताना त्याला मी पुण्यातल्या आमच्या घरासमोर असलेल्या पोहण्याच्या तलावावर घेऊन जात असे. त्याला पोहण्याची आवड निर्माण व्हावी आणि पाण्याची भीती जावी हा उद्देश.

तिथे त्याला चांगल्या एक कोच मिळाल्या. फ्लोटिंगच्या स्पर्धेत त्याच्या गटात पहिले बक्षीस मिळाले. हळूहळू तो इतर स्ट्रोकही शिकू लागला. आम्ही घर बदलल्यानंतर तो चैतन्य हेल्थ क्लबवर मनोज एरंडे ह्यांच्याकडे पोहण्याचे पुढील प्रशिक्षण घेऊ लागला. बॅक स्ट्रोक प्रकारात त्याने चांगले प्रावीण्य मिळाले, अनेक स्पर्धांमध्येही तो सहभागी व्हायचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com