नवी दिल्ली: भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर असणारे राजीव कुमार हे मंगळवारी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी (१७ फेब्रुवारी २०२५) बैठक घेऊन माजी IAS अधिकारी ग्यानेश कुमार यांची भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
या तिघांच्या बैठकीनंतर जरी नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड झाली असली तरीही त्यांची ही निवड करण्याबाबत या बैठकीत राहुल गांधी यांनी असहमती दर्शवली. त्याबाबतचे असहमती पत्र देखील त्यांनी समितीला सादर केले.
नवीन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEC) निवड यंदा प्रथमच संसदेने आणलेल्या नव्या कायद्यानुसार केली गेली आहे. मात्र या निवडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनंतरच ही निवड केली जावी असे राहुल गांधी यांनी म्हंटले होते; मात्र समितीने अधिक मताच्या जोरावर ही नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि ग्यानेश कुमार यांची भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली.
पण मुळातच मुख्य निवडणूक आयुक्ताची प्रक्रिया का बदलण्यात आली? आतापर्यंत कोणत्या पद्धतीने ही निवड केली जात होती? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ही निवड कशी करावी असे सुचविले होते? संसदेने याविषयी पहिल्यांदाच जो कायदा केला त्यानुसार ही निवड कशी झाली? आता या कायद्याला कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आव्हान दिले आहे? जाणून घेऊया सविस्तर 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून...