Artificial Intelligence : गाड्याही एकमेकींशी ‘बोलू’ लागल्या आहेत

त्यामुळे आणीबाणीची वेळ येण्याआधीच ड्रायव्हरला अलर्ट मिळतो, त्यामुळे संभाव्य अपघात टळू शकतो.
BMW i Vision Dee
BMW i Vision DeeSakal

एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाहनविश्वात मैलाचा दगड ठरू पाहात आहे. केवळ प्रवाशांची सुरक्षा एवढ्यावरच मर्यादित न राहता एआयच्या वापरातून गाड्यांची कार्यक्षमता वाढवली जात आहे.

त्यामुळे वाढणारे मायलेज, अकाली येणारा मेंटेनन्स यातून सुटका होऊन अचानक खिसा रिकामा होण्याची शक्यता कमी होते.

सागर गिरमे

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’चा सगळीकडेच बोलबाला आहे. मग ते एखादा ई-मेल लिहिण्यासाठी असो वा डिझाईन तयार करण्यासाठी असो. सगळीकडेच एआयचा वापर सढळ हाताने होत आहे.

असे असताना टेक्नॉलॉजीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असणारे वाहनविश्व तरी यातून मागे कसे राहील. एआय तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या हातात येण्याच्या आधीपासूनच वाहनांमध्ये हे तंत्रज्ञान वापरून प्रवासातील सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले टाकलेली आहेत.

पण केवळ त्यावरच न थांबता, गाडीचा परफॉर्मन्स सर्वार्थाने वाढून ती अधिक किफायतशीर कशी होईल, यासाठीही अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.

त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होत असल्याने असे फीचर असणाऱ्या गाड्या इतरांच्या तुलनेत स्वतःचे वेगळेपण ठसवत आहेत.

BMW i Vision Dee
Futuristic Car :हॉलिवूड मूव्हीतल्या कार दिसणार आपल्याही दारात

इंधन कार्यक्षमता: वाहन घेताना काही अपवाद वगळता बहुतांश ग्राहक आधी मायलेजचा विचार करतात. अजूनही वाहन खरेदी करताना आपल्या देशात ‘कितना देती है’ हा प्रश्न असतोच.

कंपन्या जाहिरातींमध्ये जे दावे करतात त्याप्रमाणे मायलेज प्रत्यक्षात रस्त्यावर मिळेल असे नाही, कारण मायलेज किंवा एक लिटर इंधनामध्ये वाहन किती अंतर जाईल हा आकडा ड्रायव्हरची चालविण्याची पद्धत, गियर शिफ्टिंग, वाहनाची स्थिती, रस्ते यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.

अशा अनेक कारणांमुळे दरवेळी अपेक्षित मायलेज मिळेलच असे नाही. अशा वेळी एआयचा वापर करून ड्रायव्हिंग पॅटर्न, रस्त्यांची स्थिती या सर्व डेटाचे अल्गोरिदमद्वारे रिअल टाइममध्येच विश्लेषण करून ड्रायव्हरचा गाडी चालविण्याचा पॅटर्न आणि रस्त्याच्या स्थिती यानुसार वाहनाला इंधन पुरवठा करणे शक्य झाले आहे.

गियर शिफ्टिंगही ऑप्टिमाइझ झाल्याने तसेच ड्रायव्हिंग पॅटर्नमुळे नाहक वाया जाणाऱ्या इंधनात बचत होऊन मायलेजमध्ये लक्षणीय वाढ शक्य होते.

इंजिन परफॉर्मन्स: इग्निशन टायमिंग आणि एअर – फ्युएल रेशो हे कोणत्याही गाडीच्या परफॉर्मन्ससाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

मात्र ड्रायव्हिंग पॅटर्नमुळे यात घोळ झाल्याने गाडीचा परफॉर्मन्स डाऊन होतो. मात्र एआयच्या वापरातून इग्निशन टायमिंग, एअर – फ्युएल रेशो यासारखे पॅरामीटर डायनॅमिकली अॅडजस्ट होत असल्याने इंजिनमधून पॉवर आणि टॉर्क योग्य वेळी, योग्य तेवढा मिळत असल्याने वाहनाची कामगिरी सुधारते.

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्थितीत गाडीची ताकद कमी भासत नाही.

BMW i Vision Dee
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

मेंटेनन्सचा अंदाज : वाहनाच्या एरवीच्या वापरापेक्षा त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कित्येकदा मालकांचे खिसे रिकामे करत असतो. वर्षातून किमान एकदा तरी या खर्चाला सर्वच वाहन मालकांना सामोरे जावेच लागते.

गाडीच्या वापरानुसार यात थोडे कमी जास्त होऊ शकते, पण गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च उचलावाच लागतो. मात्र आता एआयच्या मदतीने गाडीचे इंजिन, ट्रान्समिशन आणि सेन्सरमधून मिळणाऱ्या डेटाचे विश्लेषण करता येते.

इंजिनमधील कोणता भागांची जास्त झीज होऊ लागली आहे किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झालीये याचा आगाऊ अंदाज येतो. त्यामुळे संभाव्य बिघाड होण्याआधीच त्याची माहिती चालकाला मिळते. त्यामुळे मोठ्या खर्चातून बचाव होऊन नाहक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

वाहनांची कार्यक्षमता वाढविणे हा एकच उद्देश एआयच्या वापरात नसून त्यासोबतच सुरक्षा आणि ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद असण्यासाठीही एआयचा वापर शक्य होतो आहे.

अॅडॉप्टिव्ह इन्फोटेन्मेंट सिस्टम: आता एआय टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्याने अगदी ड्रायव्हरचा ‘स्वीय साहाय्यक’ म्हणूनही एआय कार्यरत आहे. वापरकर्त्याचे प्राधान्यक्रम किंवा त्याच्या सवयी एआय ‘शिकून घेऊ’ शकते.

त्यामुळे गाडीत ड्रायव्हर बसला की त्याच्या आवडीचे म्युझिक सुचविणे, ज्या ठिकाणी अनेकदा भेटी दिल्या आहेत ती ठिकाणे न विचारता नॅव्हिगेट करणे, ट्रॅफिकचे रिअल टाइम अपडेट देणे तसेच गाडीमध्ये सर्व प्रवाशांचा जास्तीत जास्त आरामदायी वाटण्यासाठी एआय कार्यरत राहते.

BMW i Vision Dee
Car Tips for Winter : गाडीच्या काचेवर वारंवार येतोय फॉग? 'या' टिप्सचा होईल फायदा

ड्रायव्हरवर आहे लक्ष: ड्रायव्हरची वागणूक एआय सतत अभ्यासत असते. त्यातून मिळणाऱ्या डेटाचे विश्लेषण करून वागणुकीच्या पॅटर्ननुसार ड्रायव्हरला सदैव ‘जागते’ ठेवण्याचे कामही केले जाते.

त्यासाठी चेहऱ्यावरचे हावभाव, स्टिअरिंग व्हीलच्या हालचाली, तसेच रस्त्यावरील स्थिती यांचा एकत्रित अभ्यास एआयच्या साहाय्याने केला जातो.

त्यामुळे आणीबाणीची वेळ येण्याआधीच ड्रायव्हरला अलर्ट मिळतो, त्यामुळे संभाव्य अपघात टळू शकतो.

कनेक्टेड कार: आतापर्यंत माणसे किंवा प्राणीच किंवा फारतर एकमेकांशी जोडलेले संगणक त्यांच्या त्यांच्या भाषेत एकमेकांशी संवाद साधू शकत होती. मात्र एआय विकसित झाल्याने आपल्या गाड्याही एकमेकींशी ‘बोलू’ लागल्या आहेत.

हे बोलणे डेटाच्या स्वरूपात असले तरी, योग्य ते संदेश गाड्यांपर्यंत पोहोचतात, हे नक्की! सध्याच्या बऱ्याच कार सर्व्हरला कनेक्टेड आहेत. गाडी चालविण्याच्या पॅटर्नपासून कोणत्या रस्त्याने गाडी जाते, कुठे पार्क होते, हा सगळा डेटा जमा होत आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या गाड्यांमधून आलेल्या डेटाचे विश्लेषण करून अडथळे, ट्रॅफिक जाम, योग्य रस्ते असे विविध संदेश एकमेकांना पोचविले जात आहेत.

या संदेशानुसार ड्रायव्हरने कृती केल्यास त्यांच्या वेळेची, इंधनाची बचत तर होतच आहे, सोबत सुरक्षितताही वाढत आहे.

BMW i Vision Dee
Tesla Cars Recalled : टेस्लाच्या गाड्यांमध्ये आढळली जीवघेणी त्रुटी; कंपनीने 1,20,000 गाड्या मागवल्या परत

आव्हानांचा खडतर मार्ग

एआयच्या क्षमता अफाट आहेत, हे सिद्धच झालेले आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये डेटाची गोपनीयता, पायाभूत सुविधांची मर्यादा, हे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी यासह कित्येक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

मात्र सरकार, वाहन निर्मात्या कंपन्या आणि तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपन्यांच्या एकत्रित साह्याने या आव्हानांवर मात करता येऊ शकते.

भारतीय गाड्यांमध्ये एआय आता मूर्त स्वरूपात आलेले आहे. इंधन कार्यक्षमता वाढवण्यापासून, सुरक्षितता वाढवण्यापर्यंत, पर्सनलाईज ड्रायव्हिंगच्या अनुभवापासून ते कार्यपद्धतीच्या सुसूत्रीकरणापर्यंत एआयचा वापर होतो आहे.

हे तंत्रज्ञान आणखी विकसित, किफायती होईल, तशा अधिक बुद्धिमान आणि चालक-केंद्रित कार रस्त्यावर येतील. त्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायक होईल, हे नक्की!

----------

BMW i Vision Dee
Google Layoff: AI मुळे नोकऱ्या जाणार! गुगल 30,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com