Happy New Year 2026
Esakal
अरुण म्हात्रे
जाणाऱ्या वर्षाला निरोप देताना आख्ख्या जगानं केलेला कल्लोळ आणि जल्लोष यातून बाहेर पडून जरा शांतपणे आठवावं गेलेलं वर्ष! आपण वर्षभरात काय केलं आणि गेल्या वर्षानं आपल्या ओंजळीत काय दिलं ह्याचा शांतपणे विचार करावा. ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे गाणं गुणगुणण्याचं स्पिरिट शिल्लक आहे का, हे प्रत्येकानं तपासून बघावं फक्त.
नवे वर्ष.. नवा सूर्य
नव्या दिशा.. नवे मार्ग
नवे डोळे.. नव्या वाटा
नवे मन.. नव्या लाटा
नवी सकाळ नवीच किरणे
नवा प्रकाश नवे बहरणे
नवी हवा नव्या झूळुका
नव्या दिशेत नवा झोका..
खरंतर किरणे तीच पण नवा आभास
दिवस तसाच पण नवा उल्हास..
नव्या वर्षाची ही लक्षणे मनात आणताना मन नवे अगदी तरुण होते... नव्या कॅलेंडरच्या फांदीवर छान झोके घेते... नव्या वर्षाचे आगमन तशाच उगवणाऱ्या दिवसावर असा नवा मुलामा देते. आणि एखाद्या सणाच्या आविर्भावात सर्वांना नव्या उत्साहात नेते..
नवे कोरे मन
नवे संकल्प करते
नव्या वर्षाची नवीन डायरी घ्यायला भाग पडते...