
डॉ. कांचनगंगा गंधे, अशोक कुमार सिंग
पवित्र तुळशीचं अलौकिक रूप, स्वामी हरिदास यांचं तपस्थल, भगवान बांके बिहारींची प्रकट भूमी, जिथं राधा-कृष्णाच्या अलौकिक आणि पारलौकिक चिरंतन नात्याचं दर्शन घडतं, अशा निधीवनात माणूस भारावून जातो....!
निधीवन... मथुरेतल्या वृंदावनातलं, श्रीकृष्णांच्या बाललीलांमुळे त्या काळापासून प्रसिद्ध असलेलं हे वन ‘मधुवन’ आणि ‘तुलसी वन’ म्हणूनही ओळखलं जातं, ते तिथल्या पवित्र अन् अनोख्या वैशिष्ट्यांमुळे! राधा-कृष्णाच्या चिरंतन शाश्वत प्रेमाची सतत आठवण करून देणाऱ्या या वनात आजही राधा-कृष्णाचं अस्तित्त्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दररोज रात्री स्वर्गीय नृत्य झाल्यानंतर रंगमहालात त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात, असं मानलं जातं.