

Carolina Marin retirement
esakal
किशोर पेटकर
जागतिक बॅडमिंटन कोर्टवर कॅरोलिना मरीन आक्रमक, वेगवान आणि ताकदवान खेळासाठी ओळखली गेली. बॅडमिंटन कोर्टवर ती विद्युतगतीने वावरत असे. ही जिद्दी खेळाडू चाणाक्ष होती. प्रतिस्पर्ध्यांचे कच्चे दुवे व्यवस्थित हेरून ती वार करायची.
आधुनिक बॅडमिंटनमधील महान महिला खेळाडू कॅरोलिना मरीन हिने अखेर आपल्या दुखणाऱ्या गुडघ्याचे ऐकले. आता पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर वेगवान, चतुरस्र खेळ करणे शक्य नाही हे जाणून या ३२ वर्षीय स्पॅनिश खेळाडूने, ‘व्यावसायिक बॅडमिंटनमधील माझा प्रवास आता संपला आहे,’ असे सांगत निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांचे आभार मानले.