संपादकीय
भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग मागील काही वर्षांत विलक्षण वेगाने वाढतो आहे. डिजिटल क्रांती, स्मार्टफोनचा वाढता प्रसार, परवडणारे डेटा दर आणि तरुणांची मोठी संख्या या सर्व घटकांनी मिळून या उद्योगाच्या विकासाला प्रचंड चालना दिली आहे. या क्षेत्राची बाजारपेठ २०२३मध्ये सुमारे २३ हजार कोटी रुपये असल्याची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, आता हा आकडा केवळ चार वर्षांत वाढून २०२७पर्यंत जवळपास
७० हजार कोटी रुपयांहून अधिक होण्याचा अंदाज विविध औद्योगिक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.