

Spiritual Journey
esakal
रस्त्याच्या दोन्ही बाजू रामायणातल्या महत्त्वाच्या प्रसंगांच्या चित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. गाइडने सांगितल्याप्रमाणे अगोदर आम्ही हनुमानगढीला जाऊन दर्शन घेतले. मग राम मंदिरात आलो. श्रीरामाच्या बालरूपातल्या मूर्तीचे, रामलल्लाचे दर्शन घेतले. रामरायाचे राजस रूप डोळ्यात साठवून घेतले.
सन२०२४च्या जानेवारीत अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हाच ठरवले होते, की अयोध्येला जाऊन दर्शन घ्यायचे. त्याचा योग २०२५च्या ऑक्टोबरमध्ये आला. आमचा सातजणांचा ग्रुप तयार झाला. आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स होतो, आम्ही दोघे आणि माझ्या तिघी नणंदा आणि त्यांचे कुटुंबीय. मग अर्थातच अयोध्येबरोबर वाराणसी, प्रयागराज, गया येथेही जाऊन यायचे ठरले व त्याप्रमाणे बुकिंग केले.