Premium|Mind Museum memories : मन नावाचं अथांग म्युझियम आणि आठवणींचा अमूल्य ठेवा; कधी अनुभवली आहे का ही निवांत सैर?

Museum of Memories : मन हे आठवणींचे एक अथांग म्युझियम असून, तिथल्या अनमोल ठेव्याची चोरी कुणीही करू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या युगात इन्स्टंट व्हिजिट टाळून निवांत वेळ काढत या आठवणींच्या दालनात फेरफटका मारणे, हाच जगण्याचा खरा आनंद आहे.
Mind Museum memories

Mind Museum memories

esakal

Updated on

प्रतीक जाधव

पहिलीवहिली आठवण हे मनातल्या म्युझियममधलं सर्वात सुंदर आणि लाडकं दालन असतं. जिथं आपण एखाद्या नवख्या पर्यटकासारखं पुन्हा पुन्हा घुटमळत राहतो आणि त्या आठवणींचा आस्वाद घेत राहतो. ‘स्टोरेज स्पेस रनिंग आऊट’ म्हणून आठवणींना आपल्या सोयीनुसार ‘कस्टमाइज’ करता येत नाही. तसंच इच्छा झाली म्हणून आठवणींचा ‘बॅकअप’ही घेता येत नाही आणि वाटलं म्हणून त्या ‘डिलीट’ही करता येत नाहीत. हीच तर आयुष्यातली गंमत आहे.

म्युझियम म्हटलं, की मला आपले काही थ्रिलर बॉलिवूड चित्रपट हमखास आठवतात. म्युझियममधल्या एका अँटिक प्रेशियस हिऱ्याच्या चोरीचा प्लॅन करणारे सो-कॉल्ड कूल हिरोज, त्यांचा मास्टरमाइंड प्लॅन आणि त्यातून वाढत जाणारा सस्पेन्स, असं ढोबळ कथानक.  नावंच घ्यायची झाली, तर अगदी धूम, हॅपी न्यू इअरपासून ते आत्ता सैफ आली खानच्या ज्वेल थीफपर्यंत. त्यातले ‘थीफ हिरोज’ इतके स्मार्ट दाखवले जातात, की एखादं साधं सफरचंद चोरण्यासाठीपण ते टॉपचा माइंड प्लॅन करतील, मार्केटमधल्या नॉर्मल चोरांना कॉम्पिटिशन देतील. शेवटी अतिरंजितपणा हेच या चित्रपटांचं गमक. गमतीचा भाग सोडला, तर खरंच हे चोर एखाद्या म्युझियममधल्या अनमोल वस्तूमागे जिवाचा आटापिटा करून का पळतात? कारण त्या वस्तूंची किंमत जगात सर्वात अमूल्य असते. पण या जगात असं एक म्युझियम आहे, जिथं या मास्टरमाइंड चोरांनाच काय, तर जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच व्यक्तीला चोरी करता येणार नाही, ते म्युझियम म्हणजे आपलं ‘मन’,  आणि त्या म्युझियममधील अनमोल संवर्धनाचा ठेवा म्हणजे आठवणी...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com