संपादकीय
कोविड १९ या जागतिक महासाथीने संपूर्ण जगाला आरोग्य आणीबाणी म्हणजे नेमके काय, याची तीव्र जाणीव करून दिली. सुदृढ आरोग्य यंत्रणा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि वेळीच दिलेला प्रतिसाद या घटकांची जाणीव सर्व राष्ट्रांना झाली.
या पार्श्वभूमीवर, भविष्यातील साथीच्या रोगांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आवश्यक असल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सदस्य देशांमध्ये एकमत झाले. त्यामुळे डिसेंबर २०२१मध्ये ‘पँडेमिक ट्रिटी’ या जागतिक कराराची संकल्पना पुढे आली. या प्रस्तावित कराराचा मसुदा तयार करण्यासाठी ‘इंटरगव्हर्न्मेंटल निगोशिएटिंग बॉडी’ (आयएनबी) हा विशेष गट स्थापन करण्यात आला.