Premium|Conspiracy: तो अहवाल म्हणजे जगाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वांत मोठी ‘फेक न्यूज’ होती.!

World Politics:सगळे मिळून खल करीत असतात, की जगावर राज्य कसे करायचे?
Premium|Conspiracy: तो अहवाल म्हणजे जगाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वांत मोठी ‘फेक न्यूज’ होती.!
Updated on

कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले

प्रोपगंडामध्ये ‘डिमनायझेशन’ - राक्षसीकरण - हे तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. प्रोटोकॉल्समधून याच तंत्राचा वापर करून ज्यूविरोधी वातावरणात तेल ओतले जात होते. ज्यू समाज कानीकपाळी ओरडून सांगत होता, की हे सारे खोटे आहे. बनावट आहे. जर्मनीत फ्रँकफर्टर झायटुंग नावाचे एक दैनिक होते. त्याने हे प्रोटोकॉल्सचे प्रकरण कसे ‘फेक’ आहे, हे सातत्याने प्रसिद्ध केले होते. पण त्यावर विश्वास कोण ठेवणार?

आपण बॉन्डपट पाहिलेच असतील. त्यात हमखास एक प्रसंग असतो. खलनायकाच्या गुप्त तळावर एक गुप्त बैठक सुरू असते. जगभरातील अनेक बडे लोक त्यात सहभागी असतात. ते उद्योजक असतात, बँकर असतात, राजकारणी असतात.

सगळे मिळून खल करीत असतात, की जगावर राज्य कसे करायचे? सगळी दुनिया मुठ्ठी में कशी आणायची? खलनायक भयंकर क्रूर अशी योजना मांडत असतो. आपण ते सारे जगाच्या कल्याणासाठी, उत्तम मानवी समाज निर्माण करण्यासाठी करीत आहोत, असा त्याचा दावा असतो. त्यास जो विरोध करील, त्या कार्टेलद्रोह्यास तातडीने ठार मारले जात असते.

बॉन्डपटांच्या पटकथेचा हा एक अविभाज्य भाग. हे सारे तद्दन फिल्मी. पण त्यादिवशी, म्हणजे २९ ऑगस्ट १८९७ रोजी - म्हणजे इकडे पुण्यात प्लेग आयुक्त डब्लू. सी. रँडची चाफेकर बंधूंनी हत्या केली, त्याच्या सुमारे महिनाभरानंतर - स्वित्झर्लंडमधील ऱ्हाइन नदीकाठच्या बेसेल शहरात बॉन्डपटातल्या त्या प्रसंगासारखीच घटना घडत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com