डॉ. सुबोध तिवारी
पतंजली ऋषींच्या योगसूत्रामधील अष्टांगयोगात मानवाच्या अस्तित्वाच्या पातळ्यांचा उल्लेख आहे - शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि आत्मा. प्रत्येक योगाभ्यास आपल्याला या पातळ्यांमधून पुढे जाण्यासाठी मदत करतो. योग म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाची प्राप्ती, एक अंतर्मुख करणारा प्रवास!
योग हा केवळ शारीरिक व्यायाम आहे किंवा आरोग्य राखण्याची एक दिनचर्या आहे, असा एक अपूर्ण समज अनेकांच्या मनात असतो. परंतु, योग म्हणजे केवळ आसन नव्हे. खरेतर योग हे एक आंतरिक परिवर्तनाचे साधन आहे; स्थूलत्वाकडून सूक्ष्माकडे म्हणजेच भौतिक इच्छा-आकांक्षांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आहे.