प्राची कुलकर्णी
यादी मिळण्यापासून ते जगभरात एकाच वेळी ही पेगॅसस स्टोरी प्रकाशित होण्यापर्यंतची गोष्ट, लॉरेन आणि सँड्रिनने पुस्तक रूपाने समोर आणली आहे. ही शोधपत्रकारिता कशी झाली हे आपल्याला पेगॅससमध्ये वाचायला मिळते.
पेगॅससची कहाणी आपल्या दृष्टीने महत्त्वाची यासाठी, की यातल्या ज्या देशांमध्ये पेगॅससच्या वापराचे आरोप झाले त्यात भारतही होता. तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जाऊ शकतो आणि पत्रकारिता काय दर्जा गाठू शकते, या दोन्ही बाबी ज्यांना समजून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक ‘मस्ट रीड’ आहे.