राकेश जैन
आपल्याकडे रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि अपघातांत जायबंदी होणाऱ्यांचे प्रमाण ‘गंभीर’ म्हणता येईल अशा पातळीपर्यंत पोहोचले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण वाहनांच्या केवळ एक टक्काच वाहने भारतात आहेत; मात्र जगात होणाऱ्या एकूण रस्ते अपघातांमधील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात.
सन २०२२मध्ये देशात एकूण ४ लाख ६१ हजार ३१२ रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये १ लाख ६८ हजार ४९१ जणांचा मृत्यू झाला आणि ४ लाख ४३ हजार ३६६ जण जखमी झाले. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये ११.९ टक्के, अपघाती मृत्यूंमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली होती.