आदित्य साखरे
आपण आपल्या आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी अनेक गॅजेट्स वापरतो. आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही अशी गॅजेट्स उपलब्ध असतात. भारतात पाळीव प्राण्यांसाठीची गॅजेट्स वापरण्याचा ट्रेंड नसला, तरी ही गॅजेट्स महत्त्वाची असतात. आपल्याला सोबत करणाऱ्या आपल्या मित्रांसाठी काही आवश्यक गॅजेट्स...
ट्रॅक्टिव्ह जीपीएस ट्रॅकर
ट्रॅक्टिव्ह जीपीएस हे एक असं उपकरण आहे, जे तुमच्या पाळीव प्राण्याचा सुरक्षिततेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे छोटेखानी ट्रॅकर त्यांच्या कॉलरला सहज जोडलं जातं आणि ते मोबाईलमधल्या अॅपशी कनेक्टही होतं. हे मुख्यतः कुत्रा किंवा मांजरीला लाइव्ह ट्रॅक करण्यासाठी वापरलं जातं.
कॉलरवर ट्रॅकर लावल्यानंतर ॲपमार्फत एक सेफ झोन ठरवता येतो. तुमच्या पेटनं हा सेफ झोन सोडल्यावर लगेच मोबाईल अपवर अॅलर्ट मिळतो. या ट्रॅकरमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगची सुविधाही आहे. प्राण्यांची हालचाल किती झाली आहे हे या ॲक्टिव्हिटी ट्रॅकरमुळे समजू शकतं. हे ट्रॅकर वॉटरप्रूफ आणि मजबूत आहे. त्यामुळे अनेक पालक याला प्राधान्य देतात.