

Stress management guide
esakal
डॉ. शुभ्रा शर्मा
कधीकधी गोष्टी मनासारख्या घडत नाहीत आणि मग शेवटी आपले पूर्ण लक्ष काय चुकीचे घडत आहे आणि काय नीट घडत नाही आहे, यावर केंद्रित होते. जर आपण जाणीवपूर्वक आपले लक्ष काय चांगले घडत आहे याकडे वळविले, तर आपल्याला अजून चांगले वाटेल आणि जेव्हा आपल्याला चांगले वाटते, तेव्हा आपण आपले आयुष्य अधिक चांगले घडवू शकतो. त्यामुळे आजच आनंदी विचार निवडूयात!
‘कभी कभी हम मुश्किल रास्ता सिर्फ इसलिए चुनते हैं, क्योंकि हमें लगता हैं कि इम्पॉर्टंट चीजें पाने के लिए मुश्किल रास्ता अपनाना चाहिए । हम आसान रास्ता क्यों नहीं चुन सकते?...’ डिअर जिंदगी या सिनेमामधील डॉ. जहांगिर खानचा हा डायलॉग.
किती सुंदर विचार आहे हा! कठीण रस्ता निवडण्यात आणि स्वतःवर कठोर होण्यात कोणताही मोठेपणा मला वाटत नाही. कधीही जिममध्ये न गेलेली व्यक्ती पहिल्याच दिवशी अतिवजन उचलत नाही. सोप्यापासून सुरुवात करत आपण आपली क्षमता वाढवत नेतो आणि मग हळूहळू मोठ्या आव्हानांना भिडतो. ताणतणाव व्यवस्थापन शिकतानाही असेच करायला हवे.