Premium|Sculptor Pramod Kamble : राममंदिर ते सचिनांचा पुतळा; मातीतून घडलेला कलाप्रवास...

Pramod Kamble Interview : राममंदिरापासून सचिन तेंडुलकरांच्या पुतळ्यापर्यंत अनेक भव्य शिल्पकृती घडवणारे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बालपणातील कलासंस्कार, संघर्ष आणि शिल्पकलेतील यशस्वी प्रवास उलगडला.
Pramod Kamble Interview

Pramod Kamble Interview

esakal

Updated on

श्रुती भागवत

अयोध्येतील राममंदिरातील शिल्पकृती असोत, किंवा वानखेडे स्टेडियममधील भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा पुतळा... देशभरातील अनेक महत्त्वाच्या कलाकृतींमागे असलेले शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा प्रवास संघर्ष, साधना आणि कलेवरच्या निष्ठेचा आहे. या प्रवासाविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

शिल्पकलेमध्येच करिअर करावे असे कधी वाटले? त्यातून बाहेर पडून काही वेगळे करायची इच्छा झाली का?

प्रमोद कांबळे : खरे सांगायचे तर मी शिल्पकला निवडली नाही, तर शिल्पकलेनेच मला निवडले असे मला वाटते. माझ्या घरातच कलासक्त वातावरण होते. माझे वडील दत्तात्रय गोपाळराव कांबळे संगमनेर येथील कला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते.  आपली चित्रकला, शिल्पकला जोपासताना  ते गणेशमूर्तीही घडवत असत. लहानपणी मी त्यांच्यासोबत बसून माती मळायचो, मूर्तींना हात लावायचो, रंगकाम पाहायचो. नकळतपणे मनावर कलेचे संस्कार होत गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com