
विशेष। डॉ. श्रीकांत कार्लेकर
गोव्यातील कातळशिल्पे संरक्षित म्हणून घोषित केली गेली असली, तरी ती उघड्यावरच आहेत. या शिल्पांच्या आजूबाजूला अजूनही मोठे संशोधन होणे गरजेचे आहे. शिल्पे निर्माण करताना इथल्या अश्मयुगीन माणसाने जी हत्यारे वापरली त्यातले एकही अजून इथे सापडलेले नाही. कदाचित मोठ्या उत्खननानंतर तीही मिळू शकतील. तत्कालीन निसर्गाचे आणि पर्यावरणाचे प्रतिबिंब या कातळशिल्पांत नक्कीच दडलेले आहे, असे ही शिल्पे पाहताना वाटत राहते.