डॉ. संदिप बोडके
वैद्यकीय व्यवसाय एक आदरणीय व्यवसाय मानला जातो. पण डॉक्टरांचेच मानसिक आरोग्य बिघडत आहे, हे खरेतर कटू सत्य आहे. जो दुसऱ्यांचे आजार बरे करतो, तोच नैराश्य, निद्रानाश, एकटेपणा, चिंता यांसारख्या विकारांना बळी पडतो आहे.
कामाचे अतिरिक्त तास : सर्वसाधारणपणे १२ ते १६ तास काम करूनही २४ तास इमर्जन्सीसाठी उपलब्ध असावे लागते. रेसिडेन्सीमध्ये (वैद्यकीय शिक्षण घेताना) तर २४ तास ऑन कॉल ड्युटी असते!
विश्रांतीचा अभाव : सतत त्याच वातावरणात काम केल्याने शरीर आणि मन थकून जाते आणि कामात यांत्रिकता येते.
रुग्णाचा मृत्यू : उपचारांदरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांचा रोष, गैरसमज, कुप्रसिद्धीची भीती असते.