अनुभव । डॉ. मृदुला सामक
गेल्या काही महिन्यांत मी पुणे शहरातील काही ओळखी आणि अनेक अनोळखी उद्यानांना/ बागांना/ ट्रॅक्सना भेट तर दिलीच, शिवाय प्रत्येक ठिकाणचे अंतर/क्षेत्र, सुविधा, पत्ता/स्थान आणि जॉगिंगसंबंधित माहितीचे संकलन केले. प्रत्येक लहान-मोठे उद्यान त्याचे स्वतःचे असे वैशिष्ट्य जपून आहे.
नियमित चालणे हा अनेकांसाठी एक सोपा आणि सहजसाध्य असा व्यायाम आहे. सकाळचा चालण्याचा सराव अर्थात मॉर्निंग वॉक ही एक शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या परिपूर्ण अशी गोष्ट होऊ शकते, फक्त त्यात जरा विविधता आणता आली पाहिजे.