

Pune to Varanasi Travel
esakal
श्रद्धा चांदगुडे
पुणे ते वाराणसी प्रवास माझ्यासाठी फक्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा नव्हता. तर तो स्वतःला ओळखण्याचा प्रवास होता. प्रत्येक छोट्या निर्णयाबरोबर आत्मविश्वास वाढत जातो. हॉटेल शोधण्यापासून ते स्थानिक वाहतूक समजून घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. सुरुवातीला हे सगळं कठीण वाटतं, पण नंतर जाणवतं की आपण आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त सक्षम आहोत.
आजकाल कुठेही फिरायला जायचे म्हटलं की मनात हजार प्रश्न निर्माण होतात. मी करू शकेन ना? मला जमेल ना? सगळं व्यवस्थित होईल ना? असे अनेक प्रश्न मनात घर करून बसतात. पण कदाचित याच प्रश्नांमधून पहिल्यांदा काहीतरी करण्याची हिंमत मिळते आणि एका नवीन अनुभवाची सुरुवात होते.