
अलीकडच्या काळात ग्राहकांची आर्थिक क्षमता व अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणजे पुनर्विकास प्रकल्पांतील घरांच्या किमती सध्या स्थिर आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत त्यामध्ये फारसा बदल होणार नाही.
प्रतिनिधी
पुणे हे शहर केवळ देशातूनच नव्हे, तर जगभरातून स्थलांतर करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आकर्षक पर्याय ठरत आहे. यामागचे कारण फक्त शिक्षण, रोजगार किंवा विविध संधीपुरतेच मर्यादित नाही; तर या सर्व संधींसोबतच पुणेकरांना मिळणारी उच्च दर्जाची जीवनशैलीसुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते.