Premium|Rajendra Kumar : सिनेमा आणि संगीताचा लपंडाव

Rajendra Kumar and the Rise of Family Dramas : हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात कौटुंबिक कथानक, लोकप्रिय गाणी आणि नव्या नायकांची लाट तयार होत होती. राजेंद्र कुमारच्या लोकप्रियतेसोबतच लता, रफी, किशोर यांच्या संगीतविश्वाने चित्रपटांना नवी ओळख दिली.
Rajendra Kumar and the Rise of Family Dramas

Rajendra Kumar and the Rise of Family Dramas

esakal

Updated on

सुलभा तेरणीकर

सिनेमा आणि संगीत लपंडाव खेळत होतं. मात्र अशा वेळी लोकप्रियतेची विशिष्ट चौकट असणारे फॅमिली ड्रामा सिनेमे आणि लोकप्रिय गाणी यांचा एक साचा तयार होत होता. त्याचा तुरा राजेंद्र कुमारसारख्या अभिनेत्याच्या टोपीत अलगद खोवला जात होता. फाळणीनंतर घरदार सोडून आलेल्या देखण्या, उंचापुऱ्या पंजाबी तरुणांत त्याचंही एक नाव होतं.

एव्हाना सिनेमा भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊ लागला होता. ह्या सिनेमाऋतूच्या सोहळ्यात सिनेमाइतकंच सिनेसंगीत साजरं होऊ लागलं होतं. नव्या हिरोंसोबतच नव्या गाण्यांचीही चर्चा होऊ लागली होती. लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, हेमंत कुमार, मन्ना डे यांच्या आवाजाशिवाय सिनेमाचं जग बेइमानी वाटू लागलं होतं. आणि अशातच किशोर कुमार घेऊन आले ‘सबकुछ किशोर कुमार’ असलेला झुमरू हा चित्रपट घेऊन आले. पण भाग्योदय दूर होता. इथलं यश हुलकावणी देणारं होतं...

समयची आणि सिनेमाची रिळं सारख्याच गतीनं धावत होती. दरम्यान नवं-जुनं, यश-अपयश यांच्या व्याख्याच जणू बदलत होत्या. त्रिपुराचे राजकुमार राजपाट सोडून संगीताला सर्वस्व मानून निघाले होते. बंगालचा उपसागर आता अरब सागरतीरावर आला होता. सचिन देव बर्मन हे संगीतकारांच्या फळीतले ज्येष्ठ अत्यंत व्यग्र होते. शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर आणि खय्याम, मदन मोहन यांच्यापेक्षा वेगळं तरुण संगीत देते होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com