फूडपॉइंट| प्रियंका येसेकर
केना भाजी
वाढप
३ ते ४ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन वाट्या केना भाजी, १ मध्यम आकाराचा कांदा, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ ते २ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार, १ ते २ चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, २ चमचे ओले खोबरे (ऐच्छिक).
कृती
सर्वप्रथम केना भाजी स्वच्छ धुऊन चिरावी. नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण खरपूस भाजला की कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परतावा. नंतर हळद आणि मीठ घालून हलवावे. मग त्यात चिरलेली केना भाजी घालावी आणि थोडी परतून घ्यावी. झाकण ठेवून मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटे शिजवावी आणि मधे एकदा हलवून घ्यावी. भाजी शिजल्यावर हवे असल्यास वरून ओले खोबरे घालून एक वाफ येऊ द्यावी. काही भागांत केना भाजी किंचित कडसर लागते, अशा वेळी लिंबाचा रस किंवा टोमॅटो घालून चव सुधारता येते.