Premium|Depression causes and symptoms : आळस की नैराश्य? थकवा, उदासी, एकटेपणा ओळखा; डिप्रेशनची प्राथमिक लक्षणे आणि तज्ज्ञांनी सुचवलेली सोपी स्व-मदत तंत्रे

Mental health awareness and recovery : नैराश्य ही केवळ तात्पुरती फेज नसून, ती विचारांवर आणि शरीरावर खोलवर परिणाम करणारी स्थिती आहे. योग्य लक्षणे ओळखून, तज्ज्ञांची मदत आणि स्व-मदत तंत्रांच्या साहाय्याने या नकारात्मक चक्रातून बाहेर पडणे आणि आनंदी जीवन जगणे शक्य आहे.
Depression causes and symptoms

Depression causes and symptoms

esakal

Updated on

गौरी भंडारी

कधीकधी आपल्याला सतत थकवा जाणवतो, पूर्वी आवडीने केलेल्या गोष्टींमधला रस अचानक निघून जातो. कोणत्याही कारणाशिवाय एकटे राहावेसे वाटते. आपण याला फक्त आळस किंवा एखादी आयुष्यातली फेज समजून दुर्लक्ष करतो, पण प्रत्यक्षात हे नैराश्याचे संकेत असू शकतात. आपल्या विचारांवर आणि वागण्यावर याचा कसा परिणाम होतो, हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नैराश्य म्हणजे नक्की काय, त्याची कारणे कोणती आणि अगदी साध्या उपायांनी किंवा योग्य मदतीने यातून कसे बाहेर पडता येते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

‘अक्षय आठ तास झोपल्यानंतरही थकलेला असतो, त्याला कोणाशीच बोलावेसे वाटत नाही.’ ‘रिया चित्रकलेत खूप हुशार होती आणि ती नियमितपणे चित्रे काढायची, पण गेल्या अनेक दिवसांपासून तिने तिच्या चित्रकलेच्या वहीला स्पर्शही केलेला नाही. तिला वाटते, की ती सध्या फक्त आळशी झाली आहे.’ ‘तनया तिच्या कामाच्या ठिकाणी नेहमी अनुपस्थित असते आणि जेव्हा ती कामावर असते, तेव्हा ती कोणाशी फारसे बोलत नाही. एकटीच आपल्या कामात गर्क असते.’... ही उदाहरणे नैराश्याची आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com