बापू पाडळकर
योग-प्राणायामच्या नित्य साधनेमुळे केवळ शरीरच आरोग्यसंपन्न होते असे नाही, तर मनसुद्धा निरोगी होते. निरोगी शरीरातच निरोगी मन निवास करते. सर्व चांगल्या-वाईट गोष्टींचा कारक मनच असते. म्हणूनच शरीराइतकेच मनाचे आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे. मनामध्ये उठणाऱ्या विचारांमुळे प्रत्यक्ष कृतीला दिशा प्राप्त होत असते.