Premium|Reliance Share Analysis : कोई जीता, कोई हारा...

Foreign Institutional Investors : रिलायन्सच्या तेजीसह बँक निफ्टीची आघाडी, परदेशी गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेचे संकेत आणि खनिज तेलाच्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजाराच्या आगामी दिशेचे विश्लेषण या लेखात करण्यात आले आहे.
Reliance Share Analysis

Reliance Share Analysis

esakal

Updated on

भूषण महाजन

खनिज तेल पुन्हा तेजीत आल्यास रिफायनिंग मार्जिन्स वाढतील. त्यामुळे रिफायनिंग कंपन्यांची नफाक्षमता वाढेल. पण सरकारने लगेच डिझेल व एटीएफचा निर्यात कर वाढवला. खनिज तेलापासून रसायने तयार करण्याचा व्यवसाय वाढला आहे, तसेच जिओ प्लॅटफॉर्मची भागविक्री शेअरला नवे तेज देईल असे वाटते. रिलायन्स वाढला नाही, तरी त्याला खाली येण्यास फारशी जागा नाही.

परदेशी संस्थांच्या वापसीबद्दल मागील लेखात (अब आया ऊँट पहाड के नीचे..., ता. २५ जुलै) लिहिले होते. पण एकूणच इराण-अमेरिका शांतता कराराचे बारा वाजायची शक्यता दिसू लागल्यामुळे त्यांनी पुन्हा हात आखडता घेतला. ते आले आले म्हणता म्हणता पुन्हा परत जाऊ लागले. रुपया स्थिर झाला हे शब्द उच्चारण्याच्या आतच तो पुन्हा कमजोर पडू लागला. व्हेंटिलेटर काढल्यानंतर पेशंटने मान टाकावी तसेच हे झाले! विश्‍लेषकांना आपले शब्द व अंदाज कसे लगेच गिळावे लागतात, याचे हे द्योतक आहे. जरी परदेशी संस्थांची विक्री सुरू झाली असली, तरी यावेळी त्यात एक वेगळेपण आहे. त्यांनी कॅश मार्केटमध्ये विक्री सुरूच ठेवली असली, तरी फ्युचर्समध्ये त्यांचा मंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा सिग्नल सकारात्मक आहे. तात्पर्य असे, की निर्देशांकांनी आपली आगेकूच सुरू ठेवत पाहता पाहता २४३००चा अडसर पार केला. रिलायन्स अनेक दिवसानंतर रंगात आला. प्रवर्तकांनी नऊ हजार कोटी रुपयांची खरेदी करून आपला हिस्सा वाढवला, तसेच चांगल्या कामकाजाच्या अपेक्षेने बँक निफ्टी वाढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com