Premium|Life After Retirement : निवृत्ती म्हणजे नवा प्रवास; सहजीवनासाठी मानसिक तयारी का महत्त्वाची?

Life After Retirement : निवृत्तीनंतरचे वैवाहिक आयुष्य, एकटेपणा, स्त्री-पुरुषांची मानसिक तयारी आणि बदलणाऱ्या नातेसंबंधांचा वेध घेत आनंदी, समतोल आणि अर्थपूर्ण निवृत्त जीवनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींची मांडणी.
Life After Retirement

Life After Retirement

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

एकल पुरुषांना काय करावं ते समजत नाही. पाण्याविना माशासाखी अवस्था होते त्यांची. सहचारिणीची गरज पुरुषांना जास्त असते. भारतीय लोकांमध्ये (मग ते अमेरिकेत राहणारे असोत की भारतात) सांस्कृतिक दडपणं पुष्कळ असतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकल जीवनासाठी मनाची तयारी करावी लागते. त्यासाठी पुरुषांची तयारी करून घेणं ही जबाबदारीसुद्धा स्त्रियांचीच असते.

स्त्रियांचा वृद्धत्वाकडे होणार प्रवास आणि त्यांची एकूण मनोभूमिका वेगळी असू शकते. म्हणून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून निवृत्ती नियोजनाचा वेगळा विचार करण्याची आवश्यकता, याबद्दलचे काही मुद्दे मागच्या लेखात

(ता. २७ जून) मांडले होते. संसाररथाच्या दोन चाकांमधलं बायकोचं चाक मोठं असतं, कारण तिच्यावर जास्त जबाबदारी असते. हे सर्वांनी मान्य केलं, तर महिलांचा दृष्टिकोन समजण्यास मदत होईल. काही बायका नवऱ्यापेक्षा लहान असल्या, तरी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालण्यासाठी किंवा सासू-सासऱ्यांचं करण्यासाठी लवकर निवृत्त होतात.

भारतात व्हीआरएस घेणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असावी, असा माझा अंदाज आहे. नोकरी करणारी महिला जेव्हा निवृत्त होते, तेव्हा काही वेळा ‘चला, झाला बाई संसार आणि संपली बाई नोकरी. आता मज्जा करू या’ असा बेत करते. आणि ‘बेस्ट इज येट टू कम’ म्हणून चार स्वप्नदेखील पाहते. पण महिलांनो, ‘शुभ निवृत्ती! सावधान!’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com