

Yadava Dynasty Social History
esakal
स्पृश्य-अस्पृश्य आचार-विचार मिटवणारी, त्यातील कोतेपणा दाखवणारी कुणी विभूती आपल्यात झाली नव्हती. अपवाद महानुभाव पंथ आणि वारकरी पंथ; पण या दोन्ही पंथांतसुद्धा काहींच्या मनात अहंगंड किंवा न्यूनगंड पुरेपूर असलेल्याचे जाणवत होतेच.
संत नामदेवांच्या कर्तृत्वाचा कवी म्हणून, विठ्ठलभक्त म्हणून विचार करताना त्या काळाच्या-सभोवतालच्या घटकांचा, परिस्थितीचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय त्यांच्या व्यक्तित्वाला मिळालेला आकार, घडत गेलेला पिंड इत्यादींचा विचार करता येणार नाही. मागील भागात (राजा कालस्य कारणम्..., ता. १४ मार्च) त्यांच्या काळातील राजकीय परिस्थिती कशी होती, याचा विचार आला आहे. या भागात त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार होणे महत्त्वाचे ठरते.