

Saint Namdev
sakal
संत नामदेवांच्या जन्मासंबंधी जसा वाद आहे, तसाच वाद त्यांच्या जन्मस्थळासंबंधीही आहेच. नामदेवांचे जन्मस्थान नरसी-बामणी की पंढरपूर? असा हा वाद आहे. नामदेवांचे जन्मस्थळ कोणते, यासंबंधी मतभेद असले तरी त्यांच्या पूर्वजांचे स्थान मात्र पंढरपूर नव्हते. तर ते नरसी-बामणी होते.
संत नामदेवांच्या जन्मकाळासंबंधी काही वाद असले, तरी त्यांनीच लिहिलेल्या अभंगानुसार सर्वसामान्य वाचकांनी आणि अभ्यासकांनी त्यांचा जन्मकाळ शके ११९२ म्हणजे इ.स. १२७० हा आहे, हे सर्वमान्य केले आहे. जनाबाई ही नामदेवांच्या घरची दासी. नामदेवांच्या घरच्या विठ्ठलभक्तीच्या वातावरणात तिलाही विठ्ठलभक्तीत रुची निर्माण झाली आणि नंतर तिने आपल्यापरीने अत्यंत महत्त्वाची काव्यरचना केली. आजच्या मराठी स्त्रीवादी साहित्याची मुळे शोधायची झाल्यास आपण थेट जनाबाईपर्यंत येऊन पोहोचतो. जनाबाईचा पुढील अभंग तर या स्त्रीवादी प्रवृत्तीची खरी ओळख देणारा म्हणून ओळखला जातो. तो अभंग असा-