Premium|Sant Namdev : संत नामदेव आणि तत्कालीन भारत

Sant Namdev’s Contribution to the Indian Bhakti Traditio : संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर पंजाबसह उत्तर भारतात भक्तीचा विचार पोहोचवला. वेगळी सामाजिक, धार्मिक आणि भाषिक परिस्थिती अनुभवत त्यांनी भारतीय संतपरंपरेला नवी दिशा दिली आणि वारकरी संप्रदायाची ओळख विस्तारली.
Sant Namdev

Sant Namdev

esakal

Updated on: 

डॉ. रवींद्र शोभणे

संत नामदेवांनी महाराष्ट्रात जे अनुभवले होते, त्यापेक्षा वेगळे असे अनुभव, वेगळी पार्श्वभूमी, वेगळी भाषिक स्थिती त्यांच्या उत्तर भारतातल्या वास्तव्यात त्यांना अनुभवायला मिळाली. त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात त्यांनी भारतीय संतपरंपरेला अनुभवसमृद्ध अशी कविता, भक्तीची नवी दिशा दिली हे त्यांचे श्रेय कालातीत असेच आहे.

संत नामदेवांच्या काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितीचा विचार करताना आपण तो केवळ महाराष्ट्रापुरताच केला आहे. कारण त्या अवस्थेत संत नामदेवांचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. त्यामुळे त्यांच्या जडणघडणीत, लेखनात आणि भक्तीत फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय परिस्थितीच प्रतिबिंबित होत होती. मराठी माणसाचे आराध्य असलेले दैवत विठ्ठलसुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भूमीपुरते मर्यादित होते. या दैवताला समोर ठेवून संत नामदेवांनी (संत ज्ञानेश्वरांच्या सहकार्याने) भागवत धर्माची स्थापना केली. वारकरी संप्रदायाची गुढी उभारली. पण हे केवळ महाराष्ट्रापुरतेच होते. त्यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर भावगत धर्माचा आणि वारकरी पंथांचा प्रसार होणे अशक्य होते. कारण या प्रसारासाठी किमान काही काळ जाणे आवश्यक होते. असा काळ गेल्यानंतरसुद्धा हा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्राबाहेर होणे शक्य होते का? तर याचे उत्तर नकारार्थीच असे हाती येते. तेव्हाचे कशाला, आजसुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्राबाहेर झाला नाही, हेही समजून घ्यावे लागेल. या पंथांचे आणि भागवत धर्माचे जे काही नाव आज महाराष्ट्राबाहेर (विशेषतः पंजाबात) आहे, ते केवळ आणि केवळ संत नामदेवांच्याच परिश्रमाने आणि लेखणीने आहे हे नाकारता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com