Premium|Sant Namdev: नामदेवांच्या चरित्रातील छप्पन्नचरणी अभंगाचा खरा अर्थ

Marathi saints history: संत नामदेव दरोडेखोर होते, ही कथा पूर्णपणे खोटी आणि छप्पन्नचरणी अभंगाच्या प्रक्षिप्त भागावर आधारित आहे. नामदेवांचे खरे जीवन विठ्ठलभक्ती, कीर्तन आणि आध्यात्मिक कार्यावर आधारित आहे, अपप्रचारामुळे गैरसमज पसरला.
Sant Namdev

Sant Namdev

esakal

Updated on

डॉ. रवींद्र शोभणे

संत नामदेवांच्या बाबतीत जशा काही चमत्कृतिजन्य कथा आहेत तसाच एक अक्षम्य गैरसमजसुद्धा आहे; तो म्हणजे संत नामदेव हे त्यांच्या तरुणपणी दरोडेखोर होते. हा समज का आणि कसा पसरला याचा विचार करता छप्पन्नचरणी अभंग याला जबाबदार आहेत, हे दिसून येते. हा छप्पन्नचरणी अभंग नामदेवांच्या नावावर कोणीतरी लिहिलेला आणि नामदेवांच्या नावावर टाकलेला असल्यामुळे या कथेला काहीही अर्थ उरत नाही; या अभंगातील काही उल्लेख पाहता तो उत्तरकालीन असल्याचाही दाट संशय येतो. याच अभंगातील ‘बाच्छाये तामजाह पाठविले’ (छप्पन्नचरणी अभंगातील १९ क्रमांकाचे चरण) ही फारसीमय रचना पाहून या अभंगाबद्दल शंका उपस्थित होतात. आणि पुढे पुढे हा संदर्भ अगदी सुमारपणे वापरत अनेक तथाकथित विद्वानांनी नामदेवांची चोर, दरोडेखोर म्हणून संभावना केली. शासकीय प्रतीतून (श्री नामदेव गाथा, प्रकाशन वर्ष १९७०) पुढे हा अभंग काढून टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com