Premium|Sant Namdev Literary Contributions : संत नामदेवांच्या मराठी-हिंदी काव्यातील साम्य आणि संतपरंपरेतील योगदान

Sant Namdev Marathi and Hindi Poetry : संत नामदेवांच्या मराठी आणि हिंदी काव्यातील अनुभवांची समानता, त्यांच्या गुरुपरंपरेचा प्रभाव आणि संतपरंपरेतील योगदान यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांच्या साहित्यिक कार्याचे वेगळे पैलू उलगडतो.
Sant Namdev Literary Contributions

Sant Namdev Literary Contributions

esakal

Updated on: 

डॉ. रवींद्र शोभणे

संत नामदेवांनी आपल्या काव्यात मांडलेला अनुभव दोन्ही भाषांत सारखाच आहे, हे आधी नमूद करावे लागेल. त्यांच्या चरित्रात आलेल्या घटना या जशा मराठी काव्यात आहेत, तशाच त्या हिंदी काव्यातसुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे अनुभवांची ही समानता अनुवादाच्या पातळीवर उतरणारी वाटावी एवढी समान स्वरूपाची आहे.

हिंदी व मराठीमध्ये रचना करणारे (आणि पंजाबीमध्येही) संत नामदेव हे एकच आहेत की दोन, हा काथ्याकूट मराठीत (आणि हिंदीतसुद्धा) बऱ्यापैकी झाला आहे. संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि काव्याचा सर्वांगीण अभ्यास करताना या मतांचा ऊहापोह करणे महत्त्वाचे ठरते. हा ऊहापोह करताना त्यांच्या हिंदीतील रचना आणि मराठीतील रचना यांचा तुलनात्मक अभ्यास करणे, त्या रचनांमधील अनुभवांची समानता शोधणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच संत नामदेवांच्या हिंदी व मराठी काव्यातील समरूपता शोधणे महत्त्वाचे ठरते.

काही अभ्यासक संत नामदेवांचे परमगुरू म्हणून संत ज्ञानेश्‍वर यांना हा मान देतात. त्यांच्या मते, ‘नामदेवांचे परमगुरू ज्ञानदेव हे नाथपरंपरेच्या अद्वयानंदवैभवाचे सम्राट होते. त्यांचा वारसा नामदेवांनी उचलला आणि भीमा-गोदेच्याकाठी बहरलेले अनुभूतीचे वैभव त्यांनी गंगा-यमुनेच्या पुत्रांच्या स्वाधीन केले.’ (श्रीनामदेव दर्शन, अशोक कामत, पान क्र. ५६८) म्हणजे संत नामदेवांचे कार्य काय? तर भीमा-गोदेच्या काठी आधीच बहरलेले वैभव इकडून तिकडे नेणे? त्यांचे कार्य इतके सामान्य प्रकारचे होते? किंवा मराठीतील वारकरी संत आणि भक्तसुद्धा कीर्तनात किंवा दिंडीत गजर करताना ‘ज्ञानेश्‍वर माउली, एकनाथ नामदेव तुकाराम...’ असा गजर करतात किंवा हाच गजर ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम...’ असाही केला जातो. संत बहिणाबाई (१६२८-१७००) यांनी तर संपूर्ण संत परंपरेची इमारत उभारतानाचा अभंगच रचला आहे. तो असा-

संतकृपा झाली ।

इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवे रचिला पाया ।

उभारिले देवालय ।।

नामा त्याचा किंकर ।

तेणे रचिले आवार ।।

जनार्दन एकनाथ ।

खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस ।

भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा ।

निरुपण केले ओजा ।।

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com