Premium|Sant Namdev in Punjab : विठ्ठलनामे भरीं तिन्ही लोक

Sant Namdev and Sikh Religious Literature : संत नामदेवांनी पंजाबमध्ये सुमारे वीस वर्षे वास्तव्य करून विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माचा प्रसार केला, अशी परंपरा सांगते. त्यांच्या रचनांचा गुरू ग्रंथसाहिबातील समावेश, पंजाबी समाजातील स्वीकार आणि संत नामदेवांच्या ऐतिहासिक वारशाचा या लेखातून वेध घेतला आहे.
Sant Namdev in Punjab

Sant Namdev in Punjab

esakal

Updated on: 

डॉ. रवींद्र शोभणे

फक्त एक संत नामदेव सोडले तर आपल्या जीवनाची इतकी वर्षे अशी महाराष्ट्राबाहेर घालवून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केवळ पंजाबातच नव्हे, तर उत्तर भारतातील इतर प्रांतांतसुद्धा प्रचंड निष्ठेने करणारे दुसरे कोणते संत होते? अभ्यासकांना अभ्यासाचा, त्यांच्या मतप्रतिपादनाचा अधिकार आहे, पण तो अधिकार वापरताना किंवा त्यांच्या आधारावर मते मांडताना कुणा प्रतिभावंतांचा, आद्यपुरुषाचा अधिक्षेप होऊ नये एवढा विवेक अपेक्षित आहे.

संत नामदेवांचे पंजाबात वीस वर्षे वास्तव्य होते. त्या वास्तव्यात त्यांनी गुरुमुखीत ज्या रचना केल्या त्यापैकी एकसष्ट अभंग किंवा रचना शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात समाविष्ट केलेल्या आहेत. पंजाबात वीस वर्षांच्या वास्तव्यानंतर ते महाराष्ट्रात परत आले आणि त्यानंतर त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाशी समाधी घेतली, अशी त्यांच्या उत्तर आयुष्यासंबंधीची कथा आहे. वरवर दिसणारी ही साधी कथा वाटते, पण या कथेतील काही गुंते आणि काही वळणे लक्षात घेतली, तर पुढील विवेचन अधिक सोपे होईल. यासंबंधीचा एक लेख याच मालेत बीठल बिनु संसार नही (ता. ९ मे) या शीर्षकाखाली लिहिला गेला आहे. याचा अर्थ हा लेख म्हणजे त्या लेखाची पुनरावृत्ती होय असेही नाही. तर या लेखात पंजाबीत संत नामदेव कसे प्रकट झाले आहेत, त्यांना पंजाबी किंवा गुरुमुखी भाषेने कसे स्वीकारले, पंजाबी समाजाने कसा त्यांचा स्वीकार केला, ‘जनमसाखीत’ त्यांचा विचार कसा केला गेला आणि मूळ नामदेव हेच खरे संत नामदेवच होते, याबद्दलचा विचार अध्याहृत आहे. विठ्ठलनामाचा, पर्यायाने भागवत धर्माचा प्रसार सर्वत्र करायच्या भावनेने भारावलेले संत नामदेव आपल्या गुरूच्या - विसोबा खेचरांच्या - आज्ञेने सर्वत्र विठ्ठलभक्तीची पताका फडकवीत उत्तर भारतात भ्रमंती करीत होते. ‘सुखाचे सुखरूप घेऊन जा तरी । विठ्ठलनामे भरी तिन्ही लोक ।।’ अशी विसोबा खेचरांची जणू त्यांना आज्ञा होती.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com