Premium|Sant Namdev and Warkari Tradition : वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला? संतपरंपरेतील योगदानाचा ऐतिहासिक संदर्भातून वेध

Sant Namdev and Warkari Tradition :** संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या योगदानाचा ऐतिहासिक व आध्यात्मिक संदर्भातून वेध घेत वारकरी संप्रदायाच्या पायाभरणीविषयी वेगळी मांडणी केली आहे.
Sant Namdev and Warkari Tradition

Sant Namdev and Warkari Tradition

esakal

Updated on: 

डॉ. रवींद्र शोभणे

दुःखाची शृंखला सोबत घेऊन संत ज्ञानेश्वर वयाच्या बाविशीपर्यंत या विश्वाला शांतीचा, वैश्विक सामंजस्याचा संदेश देत एक योगी म्हणून जगले. त्याचवेळी त्यांच्या मनात या समाजाप्रती असलेल्या काही संकल्पना त्यांनी संत नामदेवांसमोर ठेवल्या. त्यातूनच भागवत धर्माची आणि वारकरी संप्रदायाची संत नामदेवांनी प्रतिष्ठापना केली. अशा परिस्थितीत संत नामदेवांना या संतकुळाच्या धुरीणत्वाचे श्रेय देता येणार नाही का?

वा  रकरी संत परंपरेत ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।।’ असे वचन वापरले जाते. वारकरी संप्रदायाचा किंवा भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढविला अशी धारणा सर्वसंमत आहे. त्यात श्रद्धेचा भाग अधिक आहे. येथे मुद्दाम ‘नामदेवे रचिला पाया । तुका झाले कळस ।।’ अशी मांडणी करण्याचा सप्रमाण प्रयत्न आहे. अर्थात अशी मांडणी करताना कुणाचा अवमान किंवा अधिक्षेप करायचा हेतू मुळीच नाही. तर, तत्कालीन म्हणजे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या सामाजिक आणि आध्यात्मिक परिस्थितीचा साकल्याने विचार करून ही मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हे करताना वस्तुस्थितीचा कोणताही अपलाप होऊ नये याची काळजीही घेत आहोत. तुकाराम शिष्या संत बहिणाबाई यांनी एक अभंग रचला. तो अभंग आधी समोर ठेवू या.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालय ।।

नामा त्याचा किंकर । तेणे रचिले आवार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण केले ओजा ।।

Loading content, please wait...