home
homeEsakal

संपादकीय : घराबरोबर जोडली गेलेली मायेची ऊब आपलं जगणं अर्थवाही पूर्णत्वाकडे नेणारी

कळायला लागल्यापासून माणसानं अन्न, वस्त्रांच्या बरोबरीने निवारा ही आपली तिसरी जीवनावश्यक गरज मानली
Published on

संपादकीय

गदिमांची एक कविता आहे. मागे राहिलेल्या, कदाचित सुटून गेलेल्या खेड्यातल्या घराची आठवण सांगणारी. खेड्यामधले घर कौलारू... कवितेचं शेवटचं कडवं प्रत्येकाच्या मनात रुजलेल्या घर नावाच्या भावनेला असलेली हृदयाच्या तारा छेडणारी हळवी किनार मांडत जातं. गदिमा लिहितात –

माजघरातील उजेड मिणमिण वृद्ध कांकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू, ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढ लेकरू!

घर असं असतं, असावं. वय, ज्ञान, कर्तृत्व, धनसंपदा या मानकांवर आपण कुठेही असलो, तरी या आणि वेळोवेळी पांघरलेल्या, पांघरून घेतलेल्या सगळ्या झुली निःसंकोचपणे उतरतात ती जागा म्हणजे घर.

लौकिक जगात आपण कोणीही असलो तरी घर नावाच्या त्या आश्वासकतेचा उंबरा ओलांडल्यानंतर आपण कोणाचं तरी मूल असतो, भाऊ असतो, बहीण असतो, पती, पत्नी, आई, वडील, आत्या, काका वगैरे असतो. किंबहुना लौकिक जगातल्या यशाच्या, हुद्द्यांच्या, मान-सन्मानाच्या झुली उतरवून या नात्यांसह घरात होणारा आपला वावरच घर नावाच्या त्या व्यवस्थेला बळकट करत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com