

Military Tradition of Maharashtra
esakal
प्रशांत घाडगे
हिमालयातील बर्फाळ सीमांपासून ते वाळवंटातील रणभूमीपर्यंत, साताऱ्याचा जवान आपले कर्तव्य बजावत आहे. कठीण परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि जिवावर बेतणारे धोके असतानाही, ‘देश प्रथम’ हा मंत्र उराशी बाळगून तो उभा आहे. शूर जवानांची भूमी म्हणून साताऱ्याचा गौरव करताना, या मातीत जन्मलेल्या प्रत्येक सैनिकाच्या आई-वडिलांचा, कुटुंबाचा आणि त्या गावाचाही सन्मान करणे तितकेच आवश्यक आहे. कारण त्यांच्या त्यागातूनच देश सुरक्षित आहे.
देशाच्या इतिहासात ज्या भूमींनी शौर्य, बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा जपली, त्या भूमींमध्ये सातारा जिल्ह्याचे नाव अग्रभागी घेतले जाते. ‘शूर सैनिकांचा जिल्हा’ अशी ओळख मिळवलेला सातारा आजही देशसेवेचा तिरंगा उंचावत आहे. सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या २५ हजारांहून अधिक जवानांचा हा जिल्हा केवळ संख्येने नव्हे, तर धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याने ओळखला जातो.