Satara Kandi Phedha

Satara Kandi Phedha

esakal

Premium|Satara Kandi Phedha : साताऱ्याच्या खाद्यपरंपरेचा ठसका; पारंपरिक गोडवा आणि चविष्ट पदार्थ

Satara Food Culture : साताऱ्याची खाद्यसंस्कृती ही कंदी पेढ्याचा गोडवा आणि झणझणीत सातारी कांदा-लसूण मसाल्याच्या ठसक्याने समृद्ध असून, स्थानिक रानभाज्यांपासून ते ऐतिहासिक प्रसादापर्यंतचा हा चविष्ट वारसा सातारकरांच्या रांगड्या जडणघडणीचे आणि सधनतेचे खरे प्रतिबिंब दर्शनवतो.
Published on

मयुरी चोरगे-जाधव

स्थानिक खाद्यसंस्कृतीचा मोठा परिणाम माणसाच्या जडणघडणीवर होत असतो. साताऱ्याच्या मातीत रुजलेल्या अन्नधान्यांनी साताऱ्याची खाद्यसंस्कृती समृद्ध केली आहे. घरगुती भोजन, हॉटेल-खानावळी, ढाबे, बेकरी, मिठाई अशा सर्वच क्षेत्रांत साताऱ्यातील पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. शाकाहारी भोजनासह सामिष भोजनाचा अस्सल ‘सातारी बेत’ अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.

सातारा... पुणे आणि कोल्हापूर यांच्या मधे असलेले, सात डोंगरांच्या कुशीत वसलेले, निसर्गाच्या असंख्य रंगांची उधळण असलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे एक सधन आणि टुमदार शहर. ढोबळमानाने पाहता सातारा, पुण्यामुंबईइतके प्रगत शहर नाही. मात्र भौगोलिक दृष्टिकोनातून साताऱ्याचा विचार केला, तर चारही बाजूंनी डोंगर आणि हिरवाईने नटलेला परिसर, नद्या-ओढे-नाले, लहान-मोठी धरणे आणि भरपूर पाऊस यामुळे शेतीसाठी अतिशय पोषक जमीन आणि वातावरण इथे आहे. भाजीपाला, धान्ये, फळे यांची कमतरता नाही. इकडचा शेतकरी सधन आहे. त्याचबरोबर एका बाजूला माण-खटावसारखे दुष्काळी तालुके आहेतच, पण दुसरीकडे सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणीसारखी फळ-फळावळे असणारी शहरेही आहेत. शेतीपूरक दूध-दुभत्याचे व्यवसाय, सहकारी साखर कारखाने यांचीही कमतरता नाही. जगातील काही नामवंत ब्रँड्स साताऱ्याच्या मातीतून जन्म घेतात, याचा सातारकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो. सातारची खाद्यसंस्कृतीही त्याच्या वारशाप्रमाणेच प्रगल्भ, समृद्ध आणि चविष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com